| अ . कृषि विज्ञान केंद्रातर्फे आयोजित प्रशिक्षण वर्गातील सहभाग -शेतकरी त्यांच्या आवडीच्या आणि आवश्यक असणा-या प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी कृषि विज्ञान केंद्राकडे आपल्या नावाची व्यक्तिश,फोनवरुन, पत्राद्वारे किंवा इ-मेल करुन नोंदणी करु शकतात . एखादया गावातील शेतक-यांसाठी त्यांच्या 25 पेक्षा जास्त असल्यास कृषि विज्ञान केंद्रातर्फे त्यांच्या गावातही प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते .विविध संस्थांसाठी त्यांच्या इच्छेनूसार विशिष्ट विषयांवर खास प्रशिक्षण वर्ग देखील आयोजित केले जातात . |
 |
|
ब . कृषि विज्ञान केंद्राचे विस्तारविषयक इतर उपक्रम जसे शेतकरी मेळावा, शैक्षणिक सहल, प्रक्षेत्र दिवस इ .मध्ये नाव नोंदणी करुन सहभागी होउ शकतात . क . कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांशी संपर्क करुन शेती व शेतीशी संबंधित विषयावर सल्ल तसेच वेगवेगळया आधुनिक तंत्रज्ञानविषयक माहिती घेवू शकतात . ड . कृषि विज्ञानकेंद्रातर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी प्रात्यक्षिके आणि चाचण्या आपल्या शेतावर घेवू शकतात . इ . पीकावरील संभाव्य रोगासंदर्भातील अंदाज करण्यासाठी आणि पीकांची पाण्याची गरज काढण्यासाठी हवामान विषयक माहिती घेवू शकतातई . शेतक-यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात इच्छूक असणा-या इतर संस्था नाममात्र शुल्क देवून कृषि विज्ञान केंद्राच्या वर्ग खोल्या आणि दृकश्राव्य साधने वापरु शकतात . प . शैक्षणिक सहली बरोबर भेट देणारे शेतकरी आमचे प्रक्षेत्र, गांडूळखत प्रात्यक्षिक विभाग, हरितगृह, रोपवाटिका आणि शेती अवजारांचे सग्रहालय पाहू शकतात . नाममात्र शुल्क देवून हे शेतकरी आमच्या वसहतिगृहात मुक्कामही करु शकतात . फ . शेतकरी ना नफा ना तोटा तत्वावर खालील निविष्ठा कृषि माहिती व तंत्रज्ञान केंद्रमधून विकत घेवू शकतात . 1 . जीवाणू खते जसे ऍझोटोबॅक्टर, फॉस्फरस विरघळवणारे जिवाणू, पाचट कुजविणारे जीवाणू ई. 2 . गांडूळखत आणि गांडूळांच्या दोन प्रजाती Eisenia- foelida आणि vdrillu- elginae 3 . जैविक कीटकनाशक जसे घाटेअळीच्या नियंत्रणासाठी एच .एन .पी .व्ही . 4 . जैविक बुरशीनाशक टायकोडर्मा, पॅसिलीओमायसीस 5 . जैविक कीड नियंत्रणासाठी टायकोकार्ड (उसावरील खोडकिडीसाठी) व पिठया ढेकणाच्या नियंत्रणासाठी लेडी बर्ड बीटल 6 . धान्ये, कडधान्य आणि गळीत धान्यांच्या नवीन वाणांचे बीयाणे 7 . उस बेणे 8 . फळझाडांच्या सुधारीत जातीची कलमे 9 . फेरोमेन सापळे - चौकोनी ठिपक्याचा पतंग घाटेअळी, वांग्यातील फळ पोखरणारी आळी व उसातील खोडकिडीसाठी 10 .रासायनिक सापळे - आंबा, पेरु इ .मधील फळमाशिचे नियंत्रणासाठी 11 . स्तनदाह प्रतिबंधक संच ब . शेतकरी त्यांचे माती आणि पाण्याचे नमुने एकूण आठ घटकांसाठी किंवा त्यांच्या आवश्यक त्या घटकांसाठी आमच्या प्रयोगशाळेतून नाममात्र शुल्क देवून तपासून घेवू शकतात . इतर संख्या आणि संघटना देखील या सुविधेचा वापर करुन घेवू शकतात |