|
6. माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा या प्रयोगशाळेत माती व पाण्याचे नमुने रु. 125/- प्रति नमुना या कमीत कमी किंमतीत तपासणी करुन दिले जातात . तपासणीद्वारे जास्तीत जास्त काटेकोरपणे व तात्काळ शिफारशी करण्यासाठी प्रयोगशाळेकडे संगणक सॉफटवेअरची सुविधा आहे . प्रत्येक नमुना एकूण आठ बाबीसाठी तपासला जातो . सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, उपलब्ध फॉस्फरस, उपलब्ध पोटॅशिअम, सोडीयम, कॅल्शियम, आणि मॅग्नेशिअम इ .तसेच या प्रयोग शाळेमध्ये सूक्ष्म अन्नद्रवे तपासणीची सुविधाही उपलब्ध असून त्याद्वारे लोह ज़स्त मॅगनीज मॅग्नेशिअम ही मूल द्रव्ये तपासली जतात. त्याबरोबर पाने तपासणीची सोय ही शेतक-यासाठी. 7. वेधशाळा वेधशाळेत दैनंदिन किमान व कमाल तपमान, आर्द्रता, पर्जन्य, बाष्पीभवनाचा वेग ई . नोंदण्यासाठीची उपकरणे आहेत . ही माहिती शेतक-यांना झाडांची पाण्याची गरज व संभाव्य रोगाचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी ही माहिती मागणीनुसार विनाशुल्क पुरवली जाते . 8. शेतक-यांचे ग्रंथालय कृषि विषयक सर्व क्षेत्रासंबंधीच्या पुस्तकांचा मोठा संग्रह ग्रंथालयात आहे . ही सर्व पुस्तके शेतक-यांना माहितीसाठी विनाशुल्क उपलब्ध आहेत . कृषि क्षेत्र संशोधन करणारे विदयार्थ्री देखील संदर्भवाचनासाठी ग्रंथालयाचा वापर मोफत करु शकतात . 9. पीक आरोग्य चिकित्सालय महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने कृषि विज्ञान केंद्रात पीक आरोग्य चिकित्सालयाची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे शेतक-यांना शेतीसंबंधी सर्वप्रकारची सल्ला सेवा मोफत पुरवली जाते . शेतकरी त्यांच्या शेतीतील प्रश्नासंबंधी विविध शंकासंदर्भात मार्गदर्शनासाठी प्रत्यक्ष भेटू शकतात किंवा पत्र लिहू शकतात . एखादया रोग किंड निदानासाठी शेतावर जास्त माहिती घेणे .आवश्यक असल्यास शेतक-यांच्या शेतावर केंद्राचे शास्त्रज्ञ त्यासंदर्भात निदानासाठी मोफत भेटी ही देतात 10. कृषि बाजार माहिती केंद्र या केंद्राद्वारे महाराष्टातील विविध बाजारपेठातील (सर्व शेती उत्पादनांच्या) बाजारभावाची माहिती आणि इंटरनेट सेवा शेतक-यांना पुरवली जाते . केंद्राकडे वायरलेस इंटरनेटची 24 तास वेगवान सेवा उपलब्ध आहे . शेतकरी नाममात्र फी देवून कृषि विषयक वेगवेगळया वेबसाईटस देखील पाहू शकतात . 11. शेती अवजारे संग्रहालय संग्रहालयात बैलांच्या सहायाने आणि ट्रक्टरच्या सहायाने चालणारी बरीच औजारे उपलब्ध असून शेतकरी कृषि विज्ञान केंद्रात त्याविषयी माहिती घेवू शकतात . क्षारयुक्त जमिनीची सुधारणा करावयाच्या विविध उपायापैकी एक असणारा तीन वर्षातून एकदा जमिनीची खोल नांगरणी करण्यासाठी सबसॉईलर हे अवजार शेतक-यांना भाडे तत्वावर पुरवले जाते . 12. गांडूळखत विभाग प्रक्षेत्रावरील टाकावू पदार्थांच समृध्द अशा कंपोस्ट खतात रुपांतर करण्याचे प्रात्यक्षिक हा विभाग दाखवतो येथे गांडूळांच्यादोन वेगवेगळया जाती वाढवल्या जात आहेत . जेणेकरुन त्या शेतक-यांना उपलब्ध करुन देता येतील . विभागाची क्षमता वार्षिक 18 टन कंपोस्ट खत बनवण्याची आहे . गांडुळांच्या जाती पुढीलप्रमाणे 1. Eisenia foetida 2. Eudrillus uginae
|