रोग अनुमान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, दिनांक 17/11/ 07 शारदानगर, बारामती
मागील 3 दिवसाचे हवामानातील बदलानुसार द्राक्ष,टोमॅटो,बटाटे, गव्हू या पिकातील
रोगांचे अनुमान संगणक प्रणालीद्वारे करण्यात येते संगणक प्रणाली व रोगअनुमान
केंद्र, शारदानगर येथील कृषि विज्ञान केंद्रामध्ये बसविण्यात आले आहे रोग अनुमान
केंद्रातर्फे टोमॅटोतील ऍर्ली ब्लाईट, ऍनथ्राकनोज करपा गहू पिकावरील तांबेरा, टोमॅटो
व बटाटयावरील लेट ब्लाईट द्राक्षावरील भुरी, डावणी रोग व करपा या रोगासाठी औषध
फवारणी कार्यक्रम सुचविण्यात येत आहे
रोग अनुमान केंद्राची माहिती शारदानगर पासून 5 कि मी अंतरापर्यंत असणा-या
शेतक-याना उपयुक्त आहे
1 आजचे हवामान : दिनांक 17/11/07
1 तापमान : कमाल 31.2 डि से
किमान 14.2 डि से
2 सरासरी सापेक्ष आर्द्रता 72 टक्के
3 सुर्यप्रकाशाची उपलब्धता 10 तास 50 मिनिटे प्रतिदिन
4 एक जून 2007 पासून ते आजपर्यंतचे पर्जन्यमान 646.7 मी मी
मागील 3 दिवसांच्या हवामानाचा विचार करता,
द्राक्ष पिकासाठी
1 द्राक्षामध्ये करपा या रोगाची शक्यता आहे
2 द्राक्षामध्ये डावणी या रोगाची शक्यता आहे
3 भुरी रोगासाठी पोषक वातावरण आहे आपल्या बागेमध्ये भुरी रोग दिसत
असल्यास भुरी प्रतिबंधक बुरशीनाशके फवारावी
द्राक्षावरील डावनी रोगाच्या नियंत्रणा करीता खालील पैकी एक औषध फवारावे
1 बोर्डो मिश्रण : 0 4 - 0 8 टक्के (400- 800 ग्रँम कळीचा चुना 400-800 ग़्रॅम मोरचुद 100 लिटर पाणी द्रावणाचा सामू 7 असावा
2 मेटॅलॅक्झिल एम झेड -72 – 0.2 टक्के ( रिडोमील
3 कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.2 – 0.25 टक्के
4 मॅन्कोझेब 0 3 टक्के ( इंडोफ्रिल एम -45
5 झायरम- 2 ग्रँम लिटर 10 दिवसाच्या अंतराने फवारणी घ्यावी
द्राक्षबागेतील भुरी रोगाच्या नियंत्रणा करीता खालील पैकी एक औषधची फवारणी आवश्यक आहे. आंतर प्रवाही व स्पर्शजन्य बुरशी नाशके एका नंतर एक अशी वापरावी
1, गंधक 300 मेश भुकटीची धुरळणी करावी प्रमाण 20 कि प्रति हे
2 पाण्यात मिसळणारे गंधक - 0 2 - 0 25 टक्के
(मायक्रोसुल, वेटसुल,थायोव्हेट, सल्फेक्स - 1000-1250 ग्रॅम/500लि पाणी
43 ट्यडीओमिफॉन (बेलेटॉन - 0 1 टक्का- 15 दिवसाचे अंतराने
4 डिनोकॅप - 0.1 टक्का( कॅराथेन
5 झायरम – 0.2 टकके
6 ट्ायफोरीन - 0.15 टक्के ( सॅप्रॉल 10 दिवसाचे अंतराने
7 कार्बेनडॅझिन - 0.1 टकका ( बाविस्टीन
8 मार्फोलिन – 0.05 टकके (कॅलेक्झीन
7 ते 8 दिवसातून एकदा
द्राक्षावरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी राष्टीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथे प्रयोग चालु आहेत ऑक्टोबर छाटणीपासून राष्टीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांनी दुधाच्या चार फवारण्या घेतल्या आणि भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी याचे चांगले परीणाम दिसून आले आहेत, फवारणी करीता गायीचे दुध 10 लिटर व 100 लि पाणी,
टोमॅटो पीक
टोमॅटो पिकावर लेट ब्लाईट उर्फ करपा रोगाची शक्यता नाही
टोमॅटो पिकावर आपण मागील 5 दिवसापासून बुरशीनाशक फवारले नसेल किंवा
बुरशीनाशक फवारल्यानंतर पाउस आला असेल तर, त्वरीत बुरशीनाशक औषधाची
फवारणी घेणे आवश्यक आहे फवारणी घ्यावयाची झाल्यास झायनेब, डायथेन झेड 78,
2-2.5 ग्रॅम प्रति लि पाण्यामध्ये हेक्जाथेब, 75 डब्लयू, पी डायथेनएम 45 यापैकी एका
बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी मागील 5 दिवसाचे रोग अनुमान अंदाजानुसार टोमॅटो
पिकामध्ये अर्ली ब्लाईट व ऍनथ्राक्नोज करपा रोगाची शक्यता आहे
बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी.
क्लोरोथॅलोनील : सेफगार्ड 75 डब्ल्यू पी, कवच 75 डब्ल्यू पी, 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे
2 मॅनकोझेब : इंडोफिल एम 45, डायथेन एम 45,
2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी
3 झायरम : झायराईड 80 डब्ल्यू पी , हेक्झाझीर 80 डब्ल्यू पी, कुमान द्राव 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळावे व फवारणी करावी
बटाटा पीक
बटाटा या पीकामध्ये बळी पडणा-या जातीमध्ये रोगाची शक्यता जास्त आहे तरी 5 दिवसाच्या अंतराने बुरशीनाशक फवारणी घेणे गरजेचे आहे रोगास मध्यम प्रतिकारक्षम जातीमध्ये रोगाची शक्यता मध्यम आहे 7 दिवसाच्या अंतराने बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी
1 क्लोरोथॅलोनील : सेफगार्ड 75 डब्ल्यू पी, कवच 75 डब्ल्यू पी, 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे
2 मॅन्कोझेब : इंडोफिल एम 45, डायथेन एम 45, 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामण्ये मिसळून फवारणी करावी
3 झायरम : (झायराईड 80 डब्ल्यू पी, हेक्झाझीर 80 डब्ल्यू पी, कुमान द्राव) 2 ग्रम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळावे व फवारणी करावी यापैकी एका बुरशी नाशकाची फवाराणी घ्यावी