|
आंबा
–
रोगाचे/किडीचे नाव :
तुडतुडे
|
|
हे कीटक पाचरीच्या आकाराचे व लांबीने दोन मि.मी.
असतात. त्यांचा रंग भुरकट असून, डोक्याववर तांबड्या रंगाचे तीन ठिपके असतात.
हे कीटक अत्यंत चपळ असून त्यांची चाल तिरपी असते. |
|
मादी आंब्याच्या झाडाला पालवी फुटू लागली की, कोवळ्या पानांच्या शिरांमध्ये पानाच्या खालच्या बाजूस तसेच देठामध्ये अंडी घालते. साधारणतः एक मादी 200 पर्यंत अंडी घालते. अंड्यातून तीन ते पाच दिवसांत पिले बाहेर पडतात. तुडतुड्यांची पिले व पूर्ण वाढलेले तुडतुडे कोवळ्या पानामधून रस शोषून घेतात. त्यामुळे पाने वेडीवाकडी झालेली दिसून येतात. ऍटकिनसोनी जातीचे तुडतुडे फांदी व खोडावरील सालीच्या भेगांमध्ये, निव्हिओस्पार्सस जातीचे तुडतुडे पानांवर सुप्तावस्थेत राहतात. नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये झाडाला मोहोर फुटू लागतातच हे तुडतुडे पुन्हा जागृतावस्थेत येतात. नियंत्रण -
|