कारणीभूत घटक :
हवेतील आर्द्रता कमी झाल्यास व तापमान वाढल्यास किडीच्या प्रादुर्भाव
वाढतो ( नोव्हेंबर ते जानेवारी आणि एप्रिल मे या कालावधीत
प्रादुर्भाव जास्त असतो) दाट लागवड किंवा लागवड अंतर शिफारशीप्रमाणे
नसणे. यजमान पिके, तणे यांची उपलब्धता असणे.
रोगांचे /किडीचे वर्णन :
पिठ्या ढेकणाचा रंग पांढरा असून त्याचा आकार अंडाकृती असतो. पुर्ण
वाढ झालेल्या कीडीच्या अंगावर पांढ-या रंगाचे कापसासारखे पांढरे आवरण
असते. पिलाच्या रंग विटकरी असतो. पिठ्या ढेकणाचा मादी ३०० ते ४०० अंडी
पुंजक्यामध्ये खोडाच्या जवळ जमिनीत ५ ते १५ सेंमी. खोल घालते. किडीचा
जिवनक्रम ६७ ते १३५ दिवसात पुर्ण होतो.
नुकसानीचा प्रकार –
पुर्ण वाढ झालेला पिठ्या ढेकूण तसेच पिले अंड्यातून बाहेर पडल्यानंतर
झाडावर चढतात व कोवळ्या फांद्या, फुले, फळे, किंवा पानांवर स्थीर
होतात. आणि रस शोषण करतात. परीणामी प्रादुर्भाव झालेली पाने किंवा
कोवळी फूट आकसते व अपरीपक्व फळे गळून पडतात. प्रादुर्भाव झालेले झाड
निस्तेज व कमजोर बनते.
नियंत्रणात्मक उपाय :
जैविक उपाय :
1) कोयलोकोरस निग्रिटस स्पे. किंवा क्रीप्टोलिमस मॉन्ट्रीझीअरी
लेडीबर्ड बिटलचे परभक्षी भुंगेरे एकरी १००० ते १५०० सोडावेत. तसेच या
किडीच्या नियंत्रणासाठी क्रायसोपर्ला नीफस उमायझस, सोकोलोव्हस्की,
अनासिअस अनगायरस, इत्यादी परभक्षी किटकांचा ही वापर करता यतो.
2) व्हर्टीसिलीयम एस.पी. या बुरशीजन्य कीटकनाशकाची २५ ग्रॅम प्रती १०
लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाचा अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
3) परभक्षी भुगेरे किंवा बुरशीजन्या किटकनाशकाचा वापर केल्यास ३ ते ४
आठवडे कोणत्याही रासायनिक किटकनाशकाचा किंवा बुरशीनाशकाचा शेतात वापर
करू नये, व्हर्टीसिलीयमची शेतात फवारणी केल्यानंतर शेतात ६० ते ७०
टक्के आर्द्रता असावी
रासायनिक उपाय :
1) झाडाच्या बुंध्यावर ४०० गेज जाडीची ३० इंच रूंद प्लॅस्टीकची पट्टी
बारीक खिळ्याचा सहाय्याने बसवावा तत्पुर्वी खोडावरील भेगा शेण व
मातीचा मिश्रणाने बुजवून घ्याव्यात
2) झाडाच्या बुंध्यालगत जमिनीवर मिथिल पॅराथिऑन भुकटी २ टक्के २५ ते
५० ग्रॅम प्रमाणे जमिनीत मिसळून द्यावे.
3) प्रादुर्भाव झालेल्या भागावर मिथिल पॅराथिऑन ५० टक्के प्रवाही १०
ग्रॅम किंवा डी.डी.व्ही.पी. ७६ टकके प्रवाही १० मिली. किंवा
क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही ५ मिली + फिशऑईल रोझीन सोप १० ग्रॅम
प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
|