आंबा

 रोगाचे/किडीचे नाव : भुरी ( भुरी (मोहर) )
 

 

रोगाचे कारण : रोगकारक बुरशी - ओईडीअम मॅंगीफेरी

प्रादुर्भाव व लक्षण :
या बुरशीच्या प्रादुर्भाव कोवळ्या शेंड्यांवर प्रथमतः होतो व तेथून ती मागच्या दिशेने वाढत जाते. त्यामुळे मोहर फांदीवरील सर्व फुले गळून जातात. रोगाचा प्रादुर्भाव डोंगराळ भागातील उंचीवर असलेल्या झाडावर प्रथमतः मोठ्या प्रमाणावर आढळून येतो कलांतराने रोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो आणि मोहर फांद्या देखील वाळतात, पानगळ होते, फळावर प्रादुर्भाव झाल्यास फळे गळतात, आकार बदलतो, रंगहीन होतात.

नियंत्रणात्मक उपाय :

  • बागेतील आर्द्रता व तापमान व गारवा नियंत्रीत ठेवण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी गरजेप्रमाणे पाणी द्यावे, अच्छादन वापरावे, बागेत शेकोट्या लावाव्यात ई. तसेच बोर्डोमिश्रणाची फवारणी ठरावीक अंतराने करत रहावे.
  • बुरशी नियंत्रणात ठेवण्यासाठी सल्फर पावडरची धुरळणी करावी किंवा कोणत्याही सल्फरयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करावी किंवा बागेत गंधकाची धुरी करावी.