आंबा

  रोग :  शेंडेमर (डायबॅक)

 

उष्ण व दमट हवामानात या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. अनुकूल हवामानात रोगाची बीजे चार तासांत रुजून बुरशीची तंतुमय वाढ होते. या रोगाचा प्रादुर्भाव वर्षभर दिसत असला, तरी लागण पावसाळ्यात होते आणि कोवळ्या फांद्या 3-4 महिन्यांवर वाळायला लागतात. इतर अनेक रोगांत मर होत असली, तरी शेंडमर रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव प्रत्यक्ष शेंड्यावर होतो आणि फांदी शेंड्याकडून मागे मरत जाते. प्रथमावस्थेत सूक्ष्म काळे डाग पडतात व असंख्य काळे डाग पडल्यावर फांद्या शेंड्याकडून मागे वळत राहतात. रोगट फांद्यांच्या सालीला सुरकुत्या पडतात आणि काही वेळा डिंक पाझरू लागतो. घातक अवस्थेत सालीला भेगा पडून आतील खोड उघडे पडून काळे पडते. रोगग्रस्त झाडाची वाढ खुंटते, मोहोर कमी होऊन उत्पन्न घटते.

 

 नियंत्रणात्मक उपाय -

रोगनियंत्रणासाठी रोगग्रस्त फांद्या, फुटवे योग्य जागी कापून त्याचा नाश करावा. कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी. आवश्‍यकतेनुसार 1% बोर्डोमिश्रण किंवा 0.2% कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड किंवा 0.1% कार्बेन्डॅझिमच्या 2-3 फवारण्या कराव्यात.