|
आंबा
–
रोग : करपा |
|
|
|
|
|
या रोगाचा प्रादुर्भाव वर्षभर कधीही होऊ शकतो. जास्त आर्द्रता व 24 ते 30 अंश से. तापमान रोगास अनुकूल असते. कोवळ्या पानांवर डहाळ्यांवर रोगाचे तपकिरी ठिपके पडतात व पाने गळून पडतात. मोहोरावर प्रादुर्भाव झाल्यास तांबूस डाग पडून मोहोर वाळतो आणि फलधारणा होण्यापूर्वीच फुले वाळतात. लहान फळांवर काळे डाग पडल्यामुळे ती सुरकतून काळी पडतात. मोठी फळे डागळतात, तसेच मऊ होऊन कुजतात.
|
| नियंत्रणात्मक उपाय – |
|
नियंत्रणासाठी बागेची स्वच्छता हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. रोगग्रस्त फांद्या, पातेरा व रोगट फळे यांचा नाश करावा. रोगाची सुरवातीची लक्षणे दिसताच 1% बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी. कॉपर ऑक्झिक्लोराईड (25 ग्रॅम 10 लीटर पाण्यात), कार्बेन्डॅझिम (5 ग्रॅम 10 लीटर पाण्यात), तसेच 1 टक्के बोर्डोमिश्रण (1:1:100) ही बुरशीनाशकेही प्रभावी आहेत. |